मुंबई - अभिनेत्री श्वेता बसूने तिचा पती निर्माता रोहित मित्तलसोबत न राहण्याचा निर्णय घेतलाय. या दोघांचा विवाह गेल्यावर्षी १३ डिसेंबरला पार पडला होता. दोघांनी आपआपसात सहमतीने हा निर्णय घेतल्याचे श्वेताने इन्स्टाग्रामवर म्हटलंय.
श्वेता बसूचा संसार वर्षभरातच गुंडाळला, विभक्त होण्याचा निर्णय सहमतीने - Shweta Basu decide to leave separate from her husband
श्वेता बसूने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ही बातमी दिली आहे. दोघांनी सहमतीने हा निर्णय घेतल्याचे तिने म्हटलंय.
श्वेताने लिहिलंय, ''रोहित मित्तल आणि मी सहमतीने वेगळे होण्याचे आणि लग्नबंधनातून मुक्त व्हायचे ठरवले आहे. महिनाभर विचार केल्यानंतर या निर्णयावर आम्ही पोहोचलोय. प्रत्येक पुस्तक वाचले जात नाही याचा अर्थ असा नाही की, ते पुस्तक खराब आहे किंवा त्याला कोणी वाचू शकत नाही. काही गोष्टी अपूऱ्या सोडलेल्याच बऱ्या. चांगल्या आठवणी दिल्याबद्दल आणि मला नेहमी प्रोत्सहित केल्याबद्दल रोहित तुझे आभार. तुझे येणारे आयुष्य आनंदी होवो. नेहमीच तुझी प्रशंसक राहिन.''
श्वेताला २००२ मध्ये आलेल्या विशाल भारद्वाज यांच्या 'मकडी' चित्रपटाने प्रसिध्दी मिळाली. तिचा भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला. यावर्षीच्या सुरूवातीला विवेक अग्निहोत्री यांच्या 'द ताश्कंद फाईल्स' या चित्रपटात श्वेता शेवटची झळकली होती.