मुंबई -आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणींच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीप्रमाणे वेगळ्या कथेसोबत तो 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
समलैंगिकता या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. आयुष्मान पहिल्यांदाच या चित्रपटात समलैगिंक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. अतिशय मनोरंजक आणि धमाल कॉमेडीने या ट्रेलरला दमदार बनवले आहे.
हेही वाचा -हिना खानचा ग्लॅमरस अवतार असलेला 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित
आपलं समलैंगिक प्रेम मिळवण्यासाठी कुटुंबियाचा सामना करणारं समलैंगिक जोडपं यामध्ये पाहायला मिळणार आहे. आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार या चित्रपटात त्याच्यासोबत समलैंगिक व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
त्यांच्या प्रेमाचा त्यांचे कुटुंबीय स्विकार करतील की नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. मात्र, त्यांना समजावण्याचे विविध फंडे आयुष्मान या ट्रेलरमध्ये वापरताना दिसतो.
हेही वाचा -'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, दोन नवे पोस्टर रिलीज
नीना गुप्ता आणि गजराज राव यांची देखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.