हैदराबाद - ख्यातनाम फोटोग्राफर जी. वेंकटराम यांनी यंदाच्या अनोख्या कॅलेंडरचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या पेंटींग्जची निवड केली होती. यासाठी जी. वेंकटराम यांनी प्रसिध्द १२ नायिकांची निवड केली.
१२ सौंदर्यवती राजा रवी वर्मांच्या जगप्रसिध्द चित्रांसारख्या या कॅलेंडरमध्ये दिसत आहेत. इथे जी. वेंकटरामन यांच्या फोटोंची कमाल दिसून येते. सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन, दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि बाहुबली चित्रपटातील सौंदर्यवती रम्या कृष्णन यासारख्या लोकप्रिय नायिकांचा समावेश आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री नादिया, अभिनेत्री खूशबू सुंदर, भरत नाट्य डान्सर शोभना आणि प्रियदर्शी या रुपवतींचा कलेंडरच्या फोटोंमध्ये समावेश आहे.