मुंबई -दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी श्रुती हसन सध्या तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. अनेक दिवसांपासून ती मायकल कार्सेलसोबत रिलेशनशीपमध्ये होती. सोशल मीडियावरही त्यांचे बरेचसे फोटो त्यांनी शेअर केले होते. मात्र, आता त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.
श्रुती हसनचे बॉयफ्रेन्ड मायकल कार्सेलसोबत ब्रेकअप? लवकरच अडकणार होते लग्नबंधनात - kamal hasan
श्रृती हसन आणि मायकलने त्यांचे नाते कधीही जगापासून लपवले नाही. मायकल हा एक ब्रिटीश आर्टीस्ट आहे. त्या दोघांची भेट लंडन येथे झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.
श्रृती हसन आणि मायकलने त्यांचे नाते कधीही जगापासून लपवले नाही. मायकल हा एक ब्रिटीश आर्टीस्ट आहे. त्या दोघांची भेट लंडन येथे झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. अनेकदा ते एकत्र दिसले. ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही वृत्त मध्यंतरी समोर आले होते. मात्र, अलिकडेच श्रृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढुन टाकले आहेत.
ती आता गायनाच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करु पाहत आहे. तिला यासाठी मायकल देखील साथ देत होता. मात्र, यावेळी तिच्या गायनाच्या कार्यक्रमाबद्दलची माहीती मायकलनेही शेअर केली नाही. त्यामुळे त्या दोघांचे नक्की काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.