मुंबई- अभिनेत्री श्रुती हासन 'सलार' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आज श्रुतीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सलार चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटरवरुन चित्रपटातील श्रुतीचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले.
अभिनेता प्रभास सहकलाकार असलेल्या या चित्रपटात श्रुती हासन आद्याची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे.
KGF Chapter 1 आणि KGF Chapter 2 या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाकडून सलार या आणखी एक मनोरंजनक चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. सुपरस्टार प्रभास आणि श्रुती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होंबळे फिल्म्स निर्मित अॅक्शन व साहसी चित्रपट आहे. या चित्रपटात साऊथ स्टार जगपती बाबूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.