महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रेया घोषालचा सिंगापूर एअरलाईन्सविरोधात 'राग', सोशल मीडियावर व्यक्त केला संताप - airlines

श्रेया घोषाल सोशल मीडियावर फारशी व्यक्त होत नाही. मात्र, तिच्या या ट्विटमुळे चाहत्यांनीही तिला आलेल्या अनुभवाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

श्रेया घोषालचा सिंगापूर एअरलाईन्सविरोधात 'राग', सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

By

Published : May 18, 2019, 5:40 PM IST

मुंबई -बॉलिवूडची आघाडीची पार्श्वगायिका श्रेया घोषाल नेहमी तिच्या मधुर आवाजाने चाहत्यांवर भूरळ घालते. ती कधीच फारशी संतापलेली दिसत नाही. मात्र, अलिकडेच तिला सिंगापूरला जाताना एक कटू अनुभव आल्यामुळे तिने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

श्रेयाने ट्विटरवर एक ट्विट करत लिहिले होते, की 'एखाद्या कलाकाराने अमुल्य वाद्य सोबत घेऊन आपल्या विमानाने प्रवास करावा, अशी सिंगापूर एअरलाईन्सची इच्छा नसावी. ठीक आहे, धन्यवाद. यातून धडा मिळाला', असे उपरोधिक ट्विट तिने केल्यानंतर चाहत्यांनीही सिंगापूर एअरलाईन्सला धारेवर धरले.

श्रेयाच्या या ट्विटनंतर लगेचच सिंगापूर एअरलाईन्सच्या ट्विटरवरून श्रेयाची माफी मागण्यात आली. तिच्या तक्रारीबद्दल आणखी काही तपशील मिळू शकेल का? असे त्यांनी तिला विचारले आहे.

श्रेया घोषाल सोशल मीडियावर फारशी व्यक्त होत नाही. मात्र, तिच्या या ट्विटमुळे चाहत्यांनीही तिला आलेल्या अनुभवाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details