महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

श्रध्दा कपूरने अशा प्रकारे केले प्रभासचे स्वागत - Instagram

बाहुबलीचा अभिनेता प्रभास काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. साहो या आगामी चित्रपटात श्रध्दा कपूर प्रभासोबत काम करीत आहे. इन्स्टाग्रामवर प्रभासचे श्रध्दाने स्वागत केले आहे.

प्रभासचे इन्स्टाग्रामवर पदार्पण

By

Published : Apr 27, 2019, 11:20 PM IST


मुंबई - अभिनेत्री श्रध्दा कपूर तिच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे आणि प्रचंड उर्जेमुळे नेहमीचचर्चेत असते. लहकलाकारांशी आदबीने वागण्याचा तिच्याकडे उत्तम गुण आहे. याचाच प्रत्यय अलिकडे तिने शेअर केलेल्या फोटोवरुन आलेला दिसतो.

बाहुबली फेम प्रभासचा एक फोटो श्रध्दाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रभासचे इन्स्टाग्रामवर पदार्पण

काही दिवसापूर्वीच इन्स्टाग्रामवर सक्रिय झालेल्या प्रभासचा एक सुंदर फोटो श्रध्दाने शेअर केलाय. या सुंदर फोटोसह तिने प्रभासचे स्वागत केले आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, इन्स्टाग्रामवर तुमचे स्वागत.सर्वाच चांगल्या माणसापैकी एक, ज्यांना मी भेटली आहे.

अशा प्रकारे श्रध्दाने प्रभासचे इनस्टाग्रामवर स्वागत केले आहे. आजपर्यंतचा सर्वात भव्या अशा साहो चित्रपटात श्रध्दा आणि प्रभास एकत्र काम करीत आहेत. १५ ऑगस्ट २०१९ रोजी साहो प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details