मुंबई -अभिनेत्री श्रद्धा कपूर अलीकडेच 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाशिवाय ती 'बागी ३' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटोही तिने शेअर केला आहे.
'बागी ३' चित्रपटातील शूटिंगचा अनुभव हा अतिशय खास होता. अतुल्य असा वेळ मी या टीमसोबत घालवला', असे कॅप्शन श्रद्धाने या फोटोवर दिले आहे.
या फोटोमध्ये श्रद्धा तिच्या संपूर्ण टीमसोबत केक कापताना दिसते.
हेही वाचा -विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटाचा हॉरर टीझर, पाहा व्हिडिओ