बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रध्दा कपूर नुकतीच मालदीवला सुट्टीचा आानंद घेऊन मुंबईला परत आली आहे. दुपारी श्रध्दाने मालदीववरून मुंबईला येण्यासाठी विमान पकडले. तिच्या इंस्टाग्रामवरून तिने ही पोस्ट शेयर केली.
श्रध्दाने सोमवारी बीचवरील फोटो चाहत्यांना शेअर केले. 'निसर्गाकडे परत जात' असा संदेश देत तिने तिचा फोटो शेयर केला आहे. मालदीव हे श्रध्दाचे आवडते डेस्टीनेशन असून ही तिची तिसरी ट्रीप आहे. वारंवार मालदीवला गेलेली पाहून तिचा भाऊ सिध्दार्थने तिला तेथेच राहण्याचा सल्ला दिला आहे. चल आता तिकडेच राहूया अशी कमेंट श्रध्दाच्या फोटोवर केली आहे.