महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हॉलिवूड हादरले : प्रॉपर्टी गनमधून सुटली खरी गोळी, सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू तर दिग्दर्शक जखमी - Accident in the shooting of the movie 'Rust'

हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्दविन याने प्रॉपर्टी गन झाडल्याने त्यातून सुटलेल्या खऱ्या गोळीने सिनेमॅटोग्राफर हलीना हट्चिन्स हिचा मृत्यू झाला आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक जोयल सोझा यांनाही गोळी लागली असून ते जखमी आहेत.

Shooting on a Hollywood movie set
हॉलिवूडच्या सेटवर खरा गोळीबार

By

Published : Oct 22, 2021, 5:31 PM IST

हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्दविन याने प्रॉपर्टी गन झाडल्याने त्यातून सुटलेल्या खऱ्या गोळीने सिनेमॅटोग्राफर हलीना हट्चिन्स हिचा मृत्यू झाला आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक जोयल सोझा यांनाही गोळी लागली असून ते जखमी आहेत.

'रस्ट' या चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना ही घटना घडली. न्यू मेक्सिकोमधील सांता फेच्या बाहेर बोनान्झा क्रीक रेंच येथे चित्रपटाचे शुटिंग सुरू होते.

सिनेमॅटोग्राफर हलीना हट्चिन्स हिला गोळी लागल्यानंतर न्यू मेक्सिको युनव्हर्सिटीच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय सिनेमॅटोग्राफर्स गिल्डने दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक जोयल सोझा यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

ज्येष्ठ अभिनेता एलेक बाल्दविन हे 68 वर्षाचे असून रस्ट या चित्रपटाचे ते निर्मातेही आहेत. प्रॉपर्टी गनमधून खरी गोळी कशी सुटली याचा शोध घेतला जात आहे. प्रॉडक्शन हाऊसने हा अपघात असल्याचे म्हटलंय. अद्यापही या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. सिनेमॅटोग्राफर हलीना हट्चिन्स हिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेच्या सेटवर फिरताना दिसला बिबट्या!

ABOUT THE AUTHOR

...view details