महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘न्यू नॉर्मल’मध्ये 'रूप नगर के चीते' च्या शेवटच्या शेड्युलच्या चित्रीकरणाला सुरुवात!

एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनणारा 'रूप नगर के चीते' या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलचे चित्रीकरण सुरु झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घोषणा झालेल्या 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

The last schedule of 'Roop Nagar Ke Chite'
'रूप नगर के चीते'चे शेवटचे शेड्यूल

By

Published : Aug 12, 2021, 2:51 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मनोरंजनसृष्टी पुन्हा होरपळली गेली होती. महाराष्ट्रात शूटिंग्सवर बंदी घातल्यामुळे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाची वेळापत्रकं बदलली गेली. परंतु आता कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसल्यामुळे चित्रीकरणांनी वेग धरला आहे. एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनणारा 'रूप नगर के चीते' या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलचे चित्रीकरण सुरु झाले आहे. काही महिन्यांपूर्वी घोषणा झालेल्या 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

'रूप नगर के चीते'चे शेवटचे शेड्यूल

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह आणि युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी या जोडगोळीच्या ह्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 'रूप नगर के चीते' हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.

कोरोना महामारीमुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. पण आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुन्हा चित्रीकरणाला वेग आला आहे. अनेक नवे आणि दर्जेदार चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार होत असलेला 'रूप नगर के चीते' चित्रपटसुद्धा येतो. पुणे आणि बेंगळुरू शहर परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी ही हटके कलाकृती आणण्यासाठी आम्ही पण तितकेच उत्सुक असल्याचे मनन शाह आणि विहान सूर्यवंशी सांगतात.

'रूप नगर के चीते'चे शेवटचे शेड्यूल

'रूप नगर के चीते' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत काम केल्याचा आनंद आणि समाधान आहे असे दोघंही, मनन शाह आणि विहान सूर्यवंशी, व्यक्त झाले.

हेही वाचा - सहदेवसोबत रॅपर बादशाहने प्रदर्शित केली "बचपन का प्यार" गाण्याची नवी आवृत्ती

ABOUT THE AUTHOR

...view details