मराठी चित्रपटांकडे त्यांच्या आशयघनतेमुळे इतर फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचे वेधले जातेय. आशयघन चित्रपट बनवायचा असल्यास अनेक अमराठी मंडळी मराठीची कास धरताना दिसताहेत. बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे, ज्याचे चित्रीकरण नुकतेच पुणे शहर आणि परिसरात सुरु झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताहेत विहान सूर्यवंशी. हटके शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे.
बॉलीवूड सिंगर्समधील अरिजित सिंग, अतीफ असलम, राहत फतेह अली खान, अरमान मलिक यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत मनन शाह यांनी संगीतकार म्हणून काम केले आहे. ‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही ही त्यांनी खूप काम केले आहे. ‘रूप नगर के चीते' हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.
बॉलीवूडचे हिट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी 'रूप नगर के चीते' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी ही जोडगोळी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा व रोमांचक अनुभव असेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.
'रूप नगर के चीते' या वर्षाखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'रूप नगर के चीते' साठी संगीतकार मनन शाहची निर्मिती आणि विहान सूर्यवंशीचे दिग्दर्शन! - Vihan Suryavanshi latest news
बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे, ज्याचे चित्रीकरण नुकतेच पुणे शहर आणि परिसरात सुरु झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताहेत विहान सूर्यवंशी.
'रूप नगर के चीते'