महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बिग बॉस'नंतर 'ट्रिपल सीट'वरुन शिवानी सुर्वेच्या भेटीस येणार 'सातारचा सलमान' - Ghanta

शिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा 'ट्रिपल सीट' आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत.

शिवानी सुर्वे

By

Published : Aug 26, 2019, 5:07 PM IST

Updated : Aug 26, 2019, 5:20 PM IST


बिग बॉसच्या दुसऱ्या सीझन मधील घरातली स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालूच राहताना दिसणार आहे.

शिवानी सुर्वेने गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीमध्ये बिग बॉस मराठी हा रिएलिटी शो केला. आपल्या पहिल्याच रिएलिटी शोमधून शिवानीने रसिकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजन रसिकांची मनं जिंकल्यावर शिवानी सुर्वे सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.

शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वेचे ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा 'ट्रिपल सीट' आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.

2016 ला शिवानीचा 'घंटा' हा सिनेमा आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. रूपेरी दूनियेत परतताना एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला 'सातारचा सलमान' तर 'ट्रिपल सीट' हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे शिवानीच्या ह्या सोनेरी भेटीने तिच्या चाहत्यांची दिवाळी नक्कीच धमाकेदार होईल.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीतून बाहेर पडणारी एकुलती एक अशी कंटेस्टंट आहे, की जी बाहेर पडताच तिचे दोन मोठे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या घरातून प्रकृतीच्या कारणास्तव ब्रेक घेऊन घरी काही काळासाठी परतलेल्या शिवानीला अजून दोन मोठ्या फिल्ममेकर्सकडूनही सिनेमाच्या ऑफर्स आल्या आहेत. ज्यावर आता शिवानी 'बिग बॉस'च्या 'ग्रँड फिनाले'नंतर घरातून बाहेर आल्यावर विचार करेल.

Last Updated : Aug 26, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details