मुंबई - रंगनाथ बबन पाचंगे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘A फक्त तूच... कारण आपलं नातं वेगळं आहे’ या नवीन मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला अहमदनगर येथे सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत टिकटॉक फेम आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी "A फक्त तूच" या चित्रपटाचा मुहूर्त निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत अहमदनगर येथे संपन्न झाला.
जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद प्रफुल एस.चरपे यांचे आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.
‘A फक्त तूच... कारण आपलं नातं वेगळं आहे’ मध्ये शिल्पा ठाकरे दिसणार वेगळ्या भूमिकेत! - a fakt tuch movie
रंगनाथ बबन पाचंगे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘A फक्त तूच... कारण आपलं नातं वेगळं आहे’ या नवीन मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला अहमदनगर येथे सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची आडारकर यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यांच्यासोबत टिकटॉक फेम आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा ठाकरे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
‘A फक्त तूच... कारण आपलं नातं वेगळं आहे’, असं नाव असलेल्या या चित्रपटाद्वारे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अहमदनगर आणि परिसरातील उत्तमोत्तम ठिकाणी हा चित्रपट चित्रित करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या वर्षात प्रेक्षकांना उत्तम कलाकृती पाहायला मिळेल. या चित्रपटात चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वांबुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत.
हे ही वाचा - आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली' प्रदर्शित होणार ‘या’ तारखेला!