महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शिल्पा शेट्टीची कुटुंबीयांसोबत साईदरबारी हजेरी - Shilpa Shetty visit saibaba temple in shirdi

शिल्पा शेट्टीसोबत यावेळी तिची बहीण शमिता आणि पती राज कुंद्रा यांनीही हजेरी लावली होती.

Shilpa Shetty at Shirdi, Shilpa Shetty seek blessings from Saibaba at Shirdi, Shilpa Shetty on her upcoming films, Shilpa Shetty visit saibaba temple in shirdi, शिल्पा शेट्टीची साईदरबारी हजेरी
शिल्पा शेट्टीची कुटुंबीयांसोबत साईदरबारी हजेरी

By

Published : Jan 25, 2020, 4:20 PM IST

शिर्डी -बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कुटुंबीयासोबत शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत तिची बहीण शमिता आणि पती राज कुंद्रा यांनीही हजेरी लावली होती. शिल्पा आणि राजच्या आईने साई समाधी मंदिरात जाऊन साईंची पाद्यपूजा केली. त्यानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अ़धिकारी दिपक मुगळीकर यांनी सर्वांचे साई मूर्ती देऊन सत्कार केला.

साईंचे दर्शन घेतल्यानंतर शिल्पाने माध्यमांशी संवाद साधला. तब्बल १२ वर्षानंतर ती 'निक्कम्मा' आणि 'हंगामा' या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच, 'सुपर डान्सर' या कार्यक्रमाच्या परिक्षकाची भूमिका देखील पार पाडते. या सर्व गोष्टींबद्दल साईंचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आल्याचे तिने यावेळी सांगितले.

शिल्पा शेट्टीची कुटुंबीयांसोबत साईदरबारी हजेरी

हेही वाचा -'जो तुम ना हो रहेंगे हम नही', चाहत्यांच्या अफाट प्रेमाने भारावला कार्तिक आर्यन

राज कुंद्रा यांनी शिल्पाला एक नवे नाव दिले आहे. बीबीसी असे हे नाव आहे. याबाबत बोलताना शिल्पाने सांगितले, की याचा अर्थ 'बॉर्न बीफोर कंप्युटर', असा होतो.

शिल्पाच्या आगामी चित्रपटात तिच्या सुप्रसिद्ध चित्रपटातील 'गाणं चुराके दिल मेरा' या गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जनही पाहायला मिळणार आहे. पंचवीस वर्षानंतर हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे मी आनंदी आहे, असेही शिल्पा यावेळी म्हणाली.

हेही वाचा - धर्मेंद्र यांनी शेअर केला शेती आणि फार्म हाऊसचा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details