मुंबई -सोशल मीडियामध्ये सध्या टिक टॉक व्हिडिओची मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. या व्हिडिओद्वारे बऱयाच जणांचे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एका मेंढपाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर आपला टिक टॉक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सलमान खान आणि माधुरी दिक्षीतवर चित्रीत झालेलं 'हम आपके है कौन' या चित्रपटातील 'ये मौसम का जादु है मितवा' या गाण्यातील काही ओळींवर हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. आपल्या मेंढ्यांना सोबत घेऊन या मेंढपाळाने हा व्हिडिओ बनवला आहे. 'इनको हम लेके चले है, अपने संग अपनी नगरीया' या ओळींवर त्याच्यासोबत त्याच्या मेंढ्याही त्याच्या मागे चालताना पाहायला मिळतात.