महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फिल्म इंडस्ट्री कुणाची प्रॉपर्टी नाही, शत्रूघ्न सिन्हांचा करण जोहरवर निशाणा - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक मुद्द्यावर वाद पेटला आहे. आता या वादात शत्रुघ्न सिन्हानेही उडी घेतली आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करणसारख्या शोवर निशाणा साधत शत्रुघ्न यांनी आमच्या काळात असे प्लान्ड शो नव्हते असे म्हटलंय.

SHATRUGHAN-SINHA
शत्रूघ्न सिन्हांचा करण जोहरवर निशाणा

By

Published : Jul 24, 2020, 3:51 PM IST

मुंबई - सुशांतसिंहच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझ्मच्या नावाने गोंधळ माजला आहे. सतत याच विषयाभोवती चर्चेच्या फौरी झडत आहेत. आरोप प्रत्यारोपांना तर ऊत आलाय.

अलिकडेच करण जोहर आणि आदित्य चोप्रावर आरोप केले होते. आता या वादात शत्रुघ्न सिन्हा यांनीही उडी घेतली आहे. एका आघाजीच्या चॅनलशी बोलताना शत्रुघ्न म्हणाले, आमच्या काळात कॉफी विथ करण शो नव्हता किंवा अशा प्रकारचे प्लान्ड कार्यक्रम होते. पुढे ते म्हणाले, हा व्यक्ती इथे राहू शकत नाही असे म्हणायला,फिल्म इंडस्ट्री कुणाची प्रॉपर्टी नाही.

या वादामध्ये कंगना रनौतने अनेकांची नावे घेऊन आरोप केले आहेत. अलिकडेच तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांना बी ग्रेड अभिनेत्री म्हणून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर तीन अभिनेत्रींमध्ये वादाची चर्चा रंगली होती. सुशांतचा सुनियोजित खून होता असे कंगना वारंवार सांगत आहे.

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी शत्रुघ्न सिन्हांनी केली सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतसिंह राजपूत १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी अहवालाच्या आधारे स्पष्ट केले होते. मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत असून आतापर्यंत ४० लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details