चित्रपटसृष्टीत अनेक जण छोटी छोटी कामं करीत वरच्या पातळीवर पोहोचतात. अर्थात कुठलेही काम छोटं किंवा मोठं नसते, परंतु मनोरंजनसृष्टीत अशी अनेक उदाहरणं आहे. आता हेच बघाना. शशि चंद्रकांत खंदारे या तरुणाने ‘क्लॅप बॉय’ म्हणून सुरुवात केली आणि आता तो चक्क दिग्दर्शकाच्या खुर्चीत बस्तान दिसतोय. त्याच्या क्लॅप बॉय ते डिरेक्टर या प्रवासातील पहिले पाऊल म्हणजे ‘जिप्सी', तो या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करीत आहे.
"जिप्सी" हा शब्द मराठी माणसांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेमुळे माहीत आहे. पण आता याच नावाचा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलं. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने "जिप्सी" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘जिप्सी’ या नावातून हा चित्रपट प्रवासावर आधारित असणार हे स्पष्ट आहे. पण टीजर पोस्टरमध्ये मोकळं आकाश दिसत असल्यानं चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.