महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शर्मिन- मिजानच्या 'मलाल'चं मराठमोळं गाणं प्रदर्शित - new song out

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर, दोन गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. आता या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

शर्मिन- मिजानच्या 'मलाल'चं मराठमोळं गाणं प्रदर्शित

By

Published : Jun 12, 2019, 3:54 PM IST

मुंबई - दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या आगामी 'मलाल' चित्रपटातून शर्मिन सेहगल आणि मिजान जाफरी हे स्टारकिड्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तर, दोन गाणीदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. आता या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. गणेशोत्सवातील धमाल असलेल्या या गाण्याचे बोल 'उधळ हो' असे आहेत.

गणेशोत्सव म्हटला की ढोल ताषांच्या गजरातील गाण्यांचे बोल कानावर पडतात. असेच 'मलाल'चे हे नवे गाणे आहे. मराठमोळा गायक आदर्श शिंदे आणि श्रेअस पुरानिक यांनी हे गाणे गायले आहे. तर, प्रशांत इंगोलेने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विशेष म्हणजे संजय लिला भन्साळी यांनीच हे गाणे कंपोज केले आहे.

'मलाल' चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. मराठी आणि गैरमराठी तरुण-तरुणीची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या गाण्यात शर्मिन सेहगल हिचा मराठमोळा लूक पाहायला मिळतो. तर, मिजान जाफरीच्या नृत्याचीही झलक यामध्ये पाहायला मिळते. हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details