मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा मावळा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायाल मिळणार आहे. त्यांच्या भूमिकेतील अजय देवगणचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. मात्र, या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार, यावरचा पडदाही दुर सारला आहे.
मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणने ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट करत शरद केळकरचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक शेअर केला आहे.