मुंबई- नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा, गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन आणि शिवमनी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर यांनाही पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
शंकर महादेवन आणि प्रभूदेवाला रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान
कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी - दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, दिग्दर्शक प्रभू देवा, गायक शंकर महादेवन, शिवमनी
पद्मश्री पुरस्कार
प्रभूदेवाला आर्ट डान्ससाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय इतर क्षेत्रांतील व्यक्तींनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यात एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते.
कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी - दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, दिग्दर्शक प्रभू देवा, गायक शंकर महादेवन, शिवमनी