मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. त्याचा 'कबिर सिंग' हा चित्रपट देखील 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तसंच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकसाठी शाहिदची वर्णी लागली आहे.
लवकरच बॉलिवूडमध्ये 'जर्सी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक तयार होणार आहे. गौतम तिन्नाउरू हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनीच मुळ चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. अलू अरविंद, अमन गिल आणि दिल राजू हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.