मुंबई - शाहिद कपूर सध्या 'कबीर सिंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरलेल्या 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदचा 'अँग्री यंग मॅन' लूक दाखवण्यात आला आहे. प्रेयसी सोडून गेल्यानंतर कबीर सिंगचे आयुष्य कशाप्रकारे नशेच्या आहारी जाते, हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. खऱ्या आयुष्यातही त्याला ब्रेकअपला सामोरे जावे लागले होते. या ब्रेकअपला तो कसा सामोरा गेला हे त्याने माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
ब्रेकअपनंतर आयुष्यात कोणतेच रंग उरले नव्हते, शाहिद कपूरचा खुलासा - breakup
सध्या शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी 'कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशनदरम्यान शाहिदला त्याच्या खऱ्या आयुष्यात झालेल्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
सध्या शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी 'कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशनदरम्यान शाहिदला त्याच्या खऱ्या आयुष्यात झालेल्या ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्याने सांगितले, की ' सर्वांना कधीतरी ब्रेकअपला सामोरे जावेच लागते. ब्रेकअपनंतर आपल्या आयुष्यातले सर्व रंगच उडून गेल्यासारखे वाटते. माझे एक रूप तर तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेच आहे. मात्र, खूप कमी लोक असतात, जे 'कबीर सिंग' प्रमाणे हतबल होतात. त्यामुळेच ही भूमिका खूप वेगळी आहे. खऱ्या आयुष्यात माझेही ब्रेकअप झाले आहे. पण, आयुष्य कोणासाठीही थांबत नाही, त्यामुळे पुढे जात राहा', असे त्याने म्हटले आहे.
शाहिद कपूरचे नाव बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींशी जोडले गेले होते. करिना कपूरसोबत तो रिलेशनशीपमध्ये होता. त्यानंतर त्याचे नाव प्रियांका चोप्रासोबतही जोडले गेले होते.