महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसवर 'कबिर सिंग'ची क्रेझ कायम, दुसऱ्या आठवड्यातही केली इतकी कमाई - arjun reddy

'कबिर सिंग' ३१२३ स्क्रिन्सवर झळकला आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक असुनही या चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहे. शाहिद आणि कियाराच्या जोडीलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बॉक्स ऑफिसवर 'कबिर सिंग'ची क्रेझ कायम, दुसऱ्या आठवड्यातही केली इतकी कमाई

By

Published : Jun 30, 2019, 12:16 PM IST

मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांचा 'कबिर सिंग' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. 'कबिर सिंग'ने पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा गल्ला जमवला होता. तर, दुसऱ्या आठवड्यातही कमाईचे आकडे हे डबल डिजीटमध्ये आहेत.

या आठवड्यात आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल १५' चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाचा परिणाम 'कबिर सिंग'वर झाला नाही. १५० कोटींचा आकडा पार करत 'कबिर सिंग'ने दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारीदेखील भरघोस कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १६३.६३ कोटींची कमाई केली आहे.

'कबिर सिंग' ३१२३ स्क्रिन्सवर झळकला आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक असुनही या चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहे. शाहिद आणि कियाराच्या जोडीलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट दोघांच्याही करिअरमधला मैलाचा दगड ठरला आहे. यावर्षीच्या 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' चित्रपटामध्ये 'कबिर सिंग'चा समावेश झाला आहे. तर, २०१९ चा हा ट्रेन्डिंग चित्रपट बनला आहे.

शाहिद-कियारा शिवाय या चित्रपट आदिल हुसैन, सोहम मुजूमदार, अर्जून बावजा, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता आणि कुणाल ठाकूर यांच्यादेखील भूमिका आहेत.
शाहिदच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजूमदार याचेही कौतुक होत आहे. यामध्ये त्याने शिवाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला असाच प्रतिसाद मिळत राहिला तर, हा चित्रपट लवकरच २०० कोटीच्या घरात पोहचेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details