महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कबिर सिंग'च्या यशानंतर शाहिदचे भाव वाढले, नव्या चित्रपटासाठी मागितले इतके कोटी - social media

'कबिर सिंग'ने तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवले आहे. अजुनही चित्रपटाची कमाई सुरूच आहे. बऱ्याच टीका, समीक्षानंतरही चित्रपटाच्या कमाईत भर पडत आहे.

'कबिर सिंग'च्या यशानंतर शाहिदचे भाव वाढले, नव्या चित्रपटासाठी मागितले इतके कोटी

By

Published : Jul 9, 2019, 6:42 PM IST

मुंबई -बॉक्स ऑफिसवर प्रिती आणि कबिरची लव्हस्टोरी चांगलीच रंगली आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या 'कबिर सिंग'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असलेलीच पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या टॉप पाच चित्रपटांमध्ये कबिर सिंगने स्थान मिळवले आहे. तसेच २२५ कोटीपेक्षा जास्त कमाईदेखील केली आहे. या यशामुळे शाहिद कपूरनेही त्याच्या मानधनात कोट्यवधींची वाढ केली आहे.

आगामी चित्रपटासाठी शाहिदने तब्बल ३० कोटी रुपये मानधन मागितले असल्याचे सांगण्यात येत आहे. कबिर सिंगच्या यशानंतर शाहिदकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये तो भूमिका साकारणार आहे. त्यामुळे शाहिदचे भाव वाढले आहेत.

'कबिर सिंग'ने तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवले आहे. अजुनही चित्रपटाची कमाई सुरूच आहे. बऱ्याच टीका, समीक्षानंतरही चित्रपटाच्या कमाईत भर पडत आहे. त्यामुळे 'कबिर सिंग'ची छाप तरुणाईवर चांगलीच पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details