मुंबई -अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या 'कबिर सिंग' चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून आतुरता आहे. हा चित्रपट सध्या प्रदर्शनाचा वाटेवर आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाची उत्सुकता वाढत असताना आता या चित्रपटाचं चौथं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ३ गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ही गाणी हिट ठरली आहेत. आता चौथ्या गाण्यातही शाहिद आणि कियाराची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.
'तेरा बन जाऊंगा': 'कबिर सिंग'च्या चौथ्या गाण्यातही दिसली शाहिद -कियाराची रोमॅन्टिक केमेस्ट्री - sandip wanga
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ३ गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ही गाणी हिट ठरली आहेत. आता चौथ्या गाण्यातही शाहिद आणि कियाराची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.
'तेरा बन जाऊंगा', असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात शाहिद आणि कियारा एकमेकांची काळजी घेताना दिसतात. अखिल सचदेवा आणि तुलसी कुमारच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्यावर चढला आहे. तर, कुमार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
'कबिर सिंग' हा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा रिमेक आहे. संदीप वांगा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'अर्जुन रेड्डी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता 'कबिर सिंग'ला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.