ठाणे -भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले ठाणे जिल्ह्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्यावर आधारित 'शहिद भाई कोतवाल' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.
'एक तर स्वातंत्र्य.. एक तर स्वर्ग', हे घोषवाक्य उरात बाळगून भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. . स्वातंत्र्याचा हा रक्तरंजित ऐतिहासिक वारसा आणि ही शौर्य कथा प्रथमच चित्रपटाद्वारे प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती झाली, मात्र आतापर्यंत असा प्रयत्न झाला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाविषयी तरुण वर्गाला उत्कंठा लागून राहिली आहे.
हेही वाचा -हरिवंशराय बच्चन यांची इच्छा पूर्ण करत बिग बींनी लिहिली भावनिक पोस्ट
स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनचे प्रविण दत्तात्रय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर एकनाथ देसले व पराग सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.