मुंबई -अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी 'कबिर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आहे. लवकरच तो कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात शाहिदच्या वैयक्तिक आयुष्यातील काही मजेदार किस्सेदेखील ऐकायला मिळणार आहेत. सध्या या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेव्हा शाहिद-मीराचं भांडण होतं, तेव्हा काय करतो शाहिद? वाचा मजेदार किस्सा - pramotion
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधील एक रॉयल कपल मानले जाते. चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून शाहिद नेहमी मीरा आणि त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. कधी कधी शाहिद आणि मिरामध्येदेखील छोट्या छोट्या कुरबुरी होत असतात.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधील एक रॉयल कपल मानले जाते. चित्रपटाच्या शूटिंगमधून वेळ काढून शाहिद नेहमी मीरा आणि त्याच्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. कधी कधी शाहिद आणि मिरामध्येदेखील छोट्या छोट्या कुरबुरी होत असतात. जेव्हा त्यांचं भांडण होतं, तेव्हा शाहिद काय करतो, असा प्रश्न कपिलने त्याला विचारला होता. याचं उत्तर देताना शाहिद म्हणाला, की 'जेव्हा मला राग येतो, तेव्हा मी तिची माफी मागतो आणि तिला जरी राग आला असेल, तरीही मीच माफी मागतो'. सोशल मीडियावर 'द कपिल शर्मा शो'चा हा प्रोमो खूप व्हायरल होत आहे.
शाहिद आणि मीराने ७ जुलै २०१५ रोजी लग्नगाठ बांधली होती. या दोघांनाही मीशा नावाची मुलगी आणि जेन नावाचा मुलगा आहे. शाहिदचा 'कबिर सिंग' चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी झळकणार आहे. आता प्रेक्षक त्याच्या या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.