महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुख खानच्या आगामी सिनेमाचे नाव असेल 'LION', डॉक्यूमेंट झाले लीक - King Khan will be in a double role

सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी दाक्षिणात्य निर्मात्यासोबतच्या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. तो दक्षिणेचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एटली कुमार यांच्यासोबत एक चित्रपटही करत आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टचा निर्णय होईपर्यंत चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता शाहरुख खान आणि एटली कुमारच्या चित्रपटाचे नाव उघड झाले आहे.

Shah Rukh Khan's upcoming movie will be titled 'LION'
शाहरुख खानच्या आगामी सिनेमाचे नाव असेल 'LION

By

Published : Sep 16, 2021, 4:44 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार शाहरुख खान सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय तो दक्षिणेचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एटली कुमार यांच्यासोबत एक चित्रपटही करत आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टचा निर्णय होईपर्यंत चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता शाहरुख खान आणि एटली कुमारच्या चित्रपटाचे नाव उघड झाले आहे.

शाहरुख खान आणि एटली कुमार यांच्या चित्रपटाचे नाव मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर उघड केले आहे. यासोबतच चित्रपटाशी संबंधित एक लीक झालेली डॉक्यूमेंटही शेअर केली आहे. लीक झालेल्या डॉक्युमेंटमध्ये चित्रपटाचे नाव 'लायन' असे सांगितले जात आहे, परंतु हे लीक झालेले डॉक्युमेंट चित्रपटाशी किती संबंधित आहे याची खात्री झालेली नाही.

चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये शाहरुख खानशिवाय या चित्रपटात साऊथ सुपरलेडी नयनतारा, प्रियामणी, कॉमेडियन अभिनेता सुनील ग्रोव्हरही मुख्य भूमिकेत असतील. तसेच, राणा दग्गुबती या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असू शकेल अशीही बातमी आहे.

सुपरस्टार विजयचीही एन्ट्री

दुसरीकडे, एटलीचा मित्र आणि साऊथचा सुपरस्टार विजय या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानुसार एटली दक्षिण आणि हिंदी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची निर्मिती करत आहे. आपल्या माहिती करीता सांगायचे तर एटलीने विजयसोबत थेरी, मर्सल आणि बिगिलसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

दुहेरी भूमिकेत असणार किंग खान

शाहरुख खानने एटलीच्या चित्रपटावर काम सुरू केले आहे. शाहरुख या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख चित्रपटात वडील आणि मुलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाला एआर रहमान यांचे संगीत असेल.

त्याचबरोबर शाहरुख आणि नयनतारा हे दोन सुपरस्टार या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान या चित्रपटाला संगीत देतील. याआधी रहमानने शाहरुखच्या दिल से, स्वदेश, वन टू का फॉर आणि जब तक है जान या चित्रपटांसाठी संगीत दिले होते. रहमान पाचव्या वेळी शाहरुखच्या चित्रपटाला संगीत देणार आहेत. चित्रपटाचे नाव 'जवान' असे सांगितले जात आहे.

हेही वाचा - Pornography case : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, विरोधात साक्षीदार पत्नी शिल्पा शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details