मुंबई -ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिअन सरकार द्वारा संचालित मेलबर्न येथे भारतीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे. ८ ते १७ ऑगस्टपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवाचा प्रमुख अतिथी म्हणून किंग खान शाहरुखला निमंत्रण दिले गेले आहे. या महोत्सवासाठी शाहरुख ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
'किंग खान' असेल १० व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा मुख्य अतिथी, 'या' ठिकाणी करण्यात येणार कार्यक्रमाचे आयोजन - Indian Film Festival
शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' चित्रपटाचा काही भाग हा मेलबर्न येथे शूट झाला होता. या चित्रपटाच्याही येथे आठवणी आहेत. आता यावेळी मी भारतीय चित्रपट महोत्सवाचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहे, असेही शाहरुख म्हणाला.
शाहरुख खानने याबाबत एका माध्यमाशी बोलताना सांगितले, 'मला मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असल्यामुळे मी फार आनंदी आहे. आपल्या देशाची विविधता असलेल्या चित्रपटसृष्टीचा उत्साह म्हणजेच हा महोत्सव आहे. यावर्षी या महोत्सवाची थिम 'धाडस' यावर आधारित आहे. त्यासाठीदेखील मी उत्साहीत आहे', असे तो म्हणाला.