मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आपल्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. यानिमित्ताने त्यांनी पती जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यांच्यात असलेल्या मैत्रीच्या नात्यामुळे त्यांचे संबंध दृढ बनल्याचेही त्यांनी म्हटलंय.
शबाना आझमीने फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री शबाना पतीकडे झुकली असून दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसत आहे.
शबाना यांना म्हटलंय, "यावर्षी ९ डिसेंबरला आमच्या लग्नाला ३६वर्षे पूर्ण होतील. जावेद म्हणतात की शबाना आणि मी इतके चांगेल मित्र आहोत की लग्न करूनही आमची मैत्री संपू शकली नाही!"