मुंबई - ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी यांना गेल्या महिण्यात अपघातात डोक्याला मार लागला होता. त्याानंतर मुंबईत त्यांच्यावर गेली १२ दिवस उपचार सुरू होते. या काळात त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहे.
शबाना आझमी घरी परतल्या, हितचिंतकांचे मानले आभार - शबाना आझमी घरी परतल्या
अभिनेत्री शबाना आझमी यांना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्या आता रुग्णालयातून घरी परतल्या आहेत. त्यांनी सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहे.
![शबाना आझमी घरी परतल्या, हितचिंतकांचे मानले आभार Shabana Azmi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5922107-thumbnail-3x2-oo.jpg)
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर १८ जानेवारीला शबाना आझमींच्या कारचा अपघात झाला. त्या कारमध्ये त्यांच्यासोबत पती जावेद अख्तरही होते. मात्र त्यांना दुखापत झाली नव्हती. शबाना यांच्या डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर त्यांना तातडीने नवी मुंबईत उपचारासाठी नेण्यात आले. प्रथोमोपचार पार पडल्यानंतर त्यांना कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले होते.
रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आज त्या घरी परतल्या. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.