महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फायर'पासून 'मेड इन हेवन'पर्यंतच्या बदलाचे शबाना आझमींनी केले कौतुक - fire

'फायर'पासून 'मेड इन हेवन'पर्यंतच्या बदलाचे शबाना आझमींनी कौतुक... समलैंगिकतेच्या बाबतीत समाजात बदल होतायेत... समाजाचे प्रतिबिंब सिनेमात उमटत असल्याचेही त्या म्हणाल्या...

बदलाचे शबाना आझमींनी कौतुक.

By

Published : Mar 18, 2019, 4:56 PM IST


मुंबई - 'फायर' या चित्रपटात समलैंगिकतेचे नाते दाखवण्यात आले होते. १९९६ साली आलेल्या या सिनेमात शबाना आझमी आणि नंदिता दास यांचे नाते दाखवण्यात आले होते. जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याला परंपरावादी लोकांनी विरोध दर्शवला होता. आता हाच समलैंगिकतेचा विषय 'मेड इन हेवन' या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात येतोय. या संपूर्ण काळात झालेला मानसिकतेतील बदल कौतुकास्पद असल्याचे शबाना आझमी यांनी म्हटले आहे.

याबद्दल बोलताना शबाना म्हणाल्या, ''तो चित्रपट १९९६मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून ते मेड इन हेवनपर्यंतचा प्रवास पाहिला तर हे एक नवे उदाहरण आहे. या विचारात मोकळेपणा आल्याचे मला वाटते.''

त्या पुढे म्हणाल्या, ''चित्रपटात समाजाचे प्रतिबिंब उमटते हे माझे नेहमी म्हणणे राहिले आहे आणि चांगले चित्रपट समजावर प्रभाव पाडतात. याच्यात एक संबंध आहे परंतु एक स्वीकार्यतादेखील आहे आणि त्याचे कौतुक व्हायला हवे.''

'फायर' सिनेमात शबाना यांनी राधा नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. राधा आपल्या जाऊसोबत प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले होते. 'सिग्नेचर मुव्ह' या सिनेमात शबाना यांनी समलैंगिक असलेल्या मुलीच्या आईची भूमिका साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details