वॉशिंग्टन - 'सेक्स अँड द सिटी' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता विली गार्सन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही. गार्सन यांच्या अकाली निधनाबद्दल कळल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे.
गार्सन यांच्या निधनानंतर हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक सहकलाकारांनी, निर्माता दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
अभिनेता ड्यूले हिलने ट्विट केले, "हे हृदयद्रावक आहे. तुझ्यावर आमचे सदैव प्रेम आहे. तुझी खूप आठवण येत राहील.RIP #WillieGarson."