पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची आणि सहभागाची संधी मिळते. या फेस्टिवलची सुरुवात १९५२मध्ये झाली होती. 2004 पासून याचे गोव्यात यशस्वीपणे आयोजन केले जात आहे. गोवा हळूहळू राष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात नाव कमावत असताना, आता इफ्फीमध्ये 'कोकणी' चित्रपटांसाठी विशेष विभाग देण्यात आला आहे. यंदाचं इफ्फीचं हे ५१वे वर्ष आहे.
सात कोकणी चित्रपटांचा समावेश..
या विभागांतर्गत कोकणी चित्रपट प्रीमियर आणि नॉन प्रीमियर अशा कॅटेगरीमध्ये दाखवले जाणार आहेत. यासाठी कोकणी भाषेतील सात चित्रपटांनी नोंदणी केली आहे. प्रीमियर विभागात पाच आणि नॉन प्रीमियर विभागात दोन चित्रपटांची नोंदणी करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अशा संजय कपूर, रजत नागपाल आणि रिधम जानवे या ज्युरी सदस्यांनी ही निवड केली आहे.