महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पुनीत राजकुमारच्या निधनानंतर कर्नाटकात 144 कलम, चित्रपटागृहे बंद, दोन चाहत्यांचा मृत्यू, दोन गंभीर - पुनीत राजकुमारच्या निधनानंतर चित्रपटागृहे बंद

कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा अभिनेता मुलगा पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर कर्नाटकात सर्वक्षेत्रात शोक पाहायला मिळत आहे. पुनीत कुमारच्या निधनाची बातमी कळताच राज्यातील सर्व सिनेथिएटर्स बंद करण्यात आली. बंगळूरूच्या रस्त्यावर पुनीत कुमार यांचे चाहते उतरले असून कर्नाटक राज्यात 144 कलाम लागू करण्यात आले आहे.

पुनीत राजकुमार
पुनीत राजकुमार

By

Published : Oct 29, 2021, 4:56 PM IST

Updated : Oct 30, 2021, 1:39 PM IST

कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा अभिनेता मुलगा पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर कर्नाटकात सर्वक्षेत्रात शोक पाहायला मिळत आहे. पुनीत कुमारच्या निधनाची बातमी कळताच राज्यातील सर्व सिनेथिएटर्स बंद करण्यात आली. बंगळूरूच्या रस्त्यावर पुनीत कुमार यांचे चाहते उतरले असून कर्नाटक राज्यात 144 कलाम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर दोन चाहत्यांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

कन्नड स्टार पुनीत राजकुमारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. व्यायामादरम्यान त्यांना छातीत कळ आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या टीमला त्यांना वाचवण्यात यश आले नाही. दरम्यान रुग्णालयाच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीनंतर कर्नाक राज्यातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोकलहर पाहायला मिळाली मोठ्या संख्येने चाहते शोक करताना दिसले. रस्त्यावर गर्दी वाढू लागल्यानंतर कर्नाटक सरकारने जमाव बंदीचा आदेश लागू करीत 144 कलाम जारी केले आहे. तसेच राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - पुनीत कुमारच्या निधनाने अनेकांना धक्का, फिल्म, क्रिकेट इंडस्ट्रीसह सर्व क्षेत्रावर शोकलहर

Last Updated : Oct 30, 2021, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details