महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सायलीच्या लग्नाच्या 'बस्ता'चं पहिलं पोस्टर लाँच - Sayali Sanjeev films

अरविंद जगताप यांनी 'बस्ता' या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट आहे.

Sayali Sanjeev starer 'Basta' film poster out
सायलीच्या लग्नाच्या 'बस्ता'च पहिलं पोस्टर लाँच

By

Published : Feb 3, 2020, 2:55 PM IST

मुंबई - लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार 'बस्ता' चित्रपटातून ३ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे.

'बस्ता'च पहिलं पोस्टर लाँच

हेही वाचा -'हॉन्टेड शिप'चा थरार असणाऱ्या 'भूत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी स्टारकास्ट आहे.

हेही वाचा - गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात धमाल बाईक राईड, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details