महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा लवकरच छोट्या पडद्यावर - Savitri Jyoti serial

सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीचे निमित्त साधून या मालिकेची पत्रकार परिषद थेट त्यांच्या जन्मगावी ठेवण्यात आली होती. या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन हा महात्मा ज्योतिबा फुलेंची तर अभिनेत्री अश्विनी कासार ही सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारत आहे.

Savitri Jyoti serial started soon on television
ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा लवकरच छोट्या पडद्यावर

By

Published : Jan 5, 2020, 7:43 PM IST

मुंबई -महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहजीवनाची आणि संघर्षाची कथा आता छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. 'सोनी मराठी' वाहिनीवर लवकरच 'सावित्रीज्योती' ही मालिका सुरू होत आहे. अलिकडेच सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या साताऱ्यातील नायगाव येथे या कार्यक्रमाची खास पत्रकार परिषद पार पडली.

सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीचे निमित्त साधून या मालिकेची पत्रकार परिषद थेट त्यांच्या जन्मगावी ठेवण्यात आली होती. या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन हा महात्मा ज्योतिबा फुलेंची तर अभिनेत्री अश्विनी कासार ही सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारत आहे. यापूर्वी नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या 'सत्यशोधक' या प्रायोगिक नाटकात अभिनेता ओंकार गोवर्धन याने ज्योतिबांची भूमिका साकारली होती.

'सावित्रीज्योती' मालिकेतील कलाकार ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांनी 'ई - टीव्ही भारत'शी संवाद साधला.

हेही वाचा- नेहा पेंडसेची लगीनघाई, पाहा संगीत आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो

अश्विनीसाठी सावित्रीबाईची भूमिका साकारणं हे मोठं आव्हान होतं. या दोघांनी या भूमिकेच्या तयारीसाठी अनेक पुस्तकं आणि संदर्भ वाचायला आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला सुरुवात केली आहे.

मालिकेची सुरुवात ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या बालपणापासून होणार आहे. सुरुवातीचे काही भाग त्याचं बालपण आपल्याला पाहायला मिळेल. लहानग्या ज्योतिबाच्या भूमिकेत बालकलाकार समर्थ पाटील हा दिसणार आहे. तर, लहानग्या सावित्रीच्या भूमिकेत बालकलाकार तृशनिका शिंदे दिसणार आहेत. समर्थन यापूर्वी 'बाळूमामाच्या नावाने चांगभलं' या मालिकेत बालपणीच्या बाळूमामाची भूमिका केली होती.

हेही वाचा- 'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस

नितीन वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेकडून या मालिकेची निर्मिती होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची कथा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांनी सुरू केलेले स्त्री शिक्षणाचं कार्य पुढे सुरू रहावे, यासाठी सोनी मराठीतर्फे एसएनडीटी विद्यापीठातील काही गरजू मुलींना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सोनी मराठीने घेतलेला आहे.

येत्या ६ जानेवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता ही मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मालिकेच्या निमित्ताने या मालिकेतील कलाकार ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांनी 'ई - टीव्ही भारत'शी संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details