कोल्हापूर - कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची एक इंचही जागा विकासकासाठी देऊ नये अशी मागणी जयप्रभा स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाने आज केली. महानगरपालिकेचे दोन नगरसेवक सुद्धा या शिष्टमंडळात होते. यावेळी शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भेट घेत इशारा वजा निवेदन सादर केलं.
जयप्रभा स्टुडिओ विभाजन प्रस्ताव मान्य करू नका, स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाची पालिकेकडे मागणी - जयप्रभा स्टुडिओ विभाजनाचा प्रस्ताव
जयप्रभा स्टुडिओची एक इंचही जागा विकासकासाठी देऊ नये, अशी मागणी जयप्रभा स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाने आज केली. यावेळी शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भेट घेत इशारा वजा निवेदन सादर केलं.
जयप्रभा स्टुडिओ
आक्रमक भूमिका घेत जयप्रभा स्टुडिओ विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेने मान्य करू नये अशी मागणी केली. दरम्यान, महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओ विभाजनाचा प्रस्ताव मान्य केला तर कोल्हापूरकर गप्प बसणार नाहीत असा इशाराही या वेळेला देण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हेरिटेज कन्झर्व्हेशन समितीने विभाजनाचा सकारात्मक प्रस्ताव सादर केला असेल तर, बिल्डर धार्जिन असणारी हेरिटेज कॉन्झर्वेशन समिती बरखास्त करावी अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली.
Last Updated : Feb 1, 2020, 8:31 PM IST