मुंबई - मुंबई मेट्रोच्या जलद प्रवासाच्या समर्थनार्थ बिग बी अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ट्विट केले. या ट्विटमुळे सेव्ह आरेच्या समर्थकांनी आज अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर निदर्शने केली.
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर निदर्शने - Save Aary workes agitatae infront of Big B
अमिताभ बच्चन यांनी आरे परिसरात होणाऱ्या वृक्ष तोडीला विरोध न करता घरी झाडे लावण्याचा सल्ला ट्विटरवरुन दिला होता. याबाबत आंदोलक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी जलसा बंगल्याच्या बाहेर निदर्शने केली.
![अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर निदर्शने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4476780-thumbnail-3x2-aa.jpg)
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मित्राला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ जावे लागले. तेव्हा त्यांनी कारने प्रवास करण्याचा निर्णय न घेता मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मेट्रोच्या जलद प्रवासामुळे बिग बींचा मित्र प्रभावित झाला. मेट्रोचा प्रवास जलद, सोयीस्कर असल्याचं मत त्यांनी नोंदवलं. प्रदूषणावर उपाय म्हणून अधिक झाडे लावा..मी माझ्या बागेत लावली तुम्ही लावली का अशा आशयाचे ट्विट बिग बींनी काल केले होते.
अमिताभ यांच्या ट्वीटचे मेट्रो प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालिका अश्विनी भिडे यांनी रिट्विट करत स्वागत केले होते. यामुळे सेव्ह आरेच्या सदस्यांनी बिग बींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.