आपल्या जोडीदारापाठेपाठ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पती-पत्नीच्या अनेक जोड्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतात. आता या जोड्यांमध्ये सावनी रविंद्र आणि तिच्या पतीचेही नाव सामिल झाले आहे. सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रच्या नवऱ्याचे डॉ. आशिष धांडेचे निर्माता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले आहे.
सावनी रविंद्रच्या नवऱ्याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण - Dr. Ashish Dhande
सावनी रविंद्रचे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम् – एक निश्चय’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्याची निर्मिती सावनीच्या पतीने केली आहे. याद्वारे डॉ. आशिष धांडे यांनी निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सावनी रविंद्रचे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम् – एक निश्चय’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्याची निर्मिती सावनीच्या पतीने केली आहे. डॉ. आशिष धांडेच्या पदार्पणाविषयी सावनी सांगते, “यंदाचा व्हॅलेंटाईन डे आमचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन-डे होता. त्यावेळी आशिषने माझ्या नवीन गाण्याची निर्मिती करायची इच्छा व्यक्त केली होती. आपलं पहिलं काम हे काहीतरी देशाभिमानाविषयीचं असावं, अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच ‘वंदे मातरम- एक निश्चय’ ह्या गाण्याची निर्मिती करायचं ठरलं.”
सावनी या गाण्याविषयी सांगते, “मी यंदा सावनी ओरिजनल्सची सीरिज सुरू केल्यावर तमिळ गाणं रिलीज केलं. त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की, मग दूसरं गाणं हिंदी करायचं ठरलं. आजवर मी इतरांनी गायलेली देशभक्तिपर गीतं कार्यक्रमांमधून गायले होते. पण माझं स्वत:च एक गाणं असावं ही इच्छा होती. म्हणून मग ‘वंदे मातरम- एक निश्चय’ गाणं आकाराला आलं. “