महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गणरायाच्या साक्षीने 'सातारचा सलमान' चित्रपटाचा टीझर लॉन्च, यशासाठी बाप्पाला साकडं - आदर्श शिंदे

'सातारचा सलमान' सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुयोग गोऱ्हे आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हे दोघे या सिनेमाच्या टीझरची प्रिंट घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानी बाप्पाला नमस्कार करून त्याला आपल्या सिनेमाला यशाचं दान देण्याचं साकडं बाप्पाकडे घातलं.

गणरायाच्या साक्षीने 'सातारचा सलमान' चित्रपटाचा टीझर लॉन्च, यशासाठी बाप्पाला साकडं

By

Published : Sep 6, 2019, 10:41 AM IST

मुंबई - खरा खुरा सलमान लालबागच्या राजाच्या दर्शनाला येऊन गेल्याची बातमी काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण हमखास ऐकायचो. पण आता चक्क आणखी एक सलमान यंदा गणेशगल्लीच्या राजाच्या दर्शनासाठी येऊन गेला. या सलमानच नाव होतं 'सातारचा सलमान'. निमित्त होतं ते या सिनेमाच्या टीझर लॉन्चचं.

'सातारचा सलमान' सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुयोग गोऱ्हे आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे हे दोघे या सिनेमाच्या टीझरची प्रिंट घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्यानी बाप्पाला नमस्कार करून त्याला आपल्या सिनेमाला यशाचं दान देण्याचं साकडं बाप्पाकडे घातलं.

हेही वाचा-हैदराबादमध्ये 'छिछोरे'ची प्रेस स्क्रीनिंग, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

या सिनेमात अमित काळभोर नावाच्या एका मुलाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अमित 'सातारचा सलमान' नक्की कसा बनतो, याची मनोरंजक गोष्ट आपल्याला सिनेमात पहायला मिळेल.

सिनेमात एक नाही तर दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. तर एकूण सहा प्रमुख व्यक्तीरेखा आहेत. सिनेमातील बाकीचे कलाकार कोण असतील, यावरून अद्याप पडदा दूर होणं बाकी आहे.

संगीतकार अमितराज याने या सिनेमाला संगीत दिलं असून आदर्श शिंदे, सचिन पिळगांवकर यांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत.

हेही वाचा-साहोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद, श्रद्धाने मानले आभार

गणेशगल्लीच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी या टीमचं स्वागत तर केलंच पण त्याचा रीतसर सत्कारही केला. त्यासोबतच गणेश मांडवात या सिनेमाच्या टीझरची झलक उपस्थित गणेशभक्तांना दाखवण्यात आली. सिनेमाचे कलाकार आणि निर्माते या अगत्याने पुरते भारावून गेले.

सिनेमाच्या बाबतीत बरीच सरप्राईज दडली असून त्यातील काही त्यांनी ई टीव्ही भारताशी बोलताना स्पष्ट केली आहेत. या दोघांशी याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी...

गणरायाच्या साक्षीने 'सातारचा सलमान' चित्रपटाचा टीझर लॉन्च, यशासाठी बाप्पाला साकडं

ABOUT THE AUTHOR

...view details