महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सरदार उधम सिंग'च्या पोस्ट प्रोडक्शनला सोमवारपासून सुरुवात, सुजित सरकार यांची माहिती - 'सरदार उधम सिंग'च्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात

सरकार यांनी सांगितलं, की 24 मार्चला देशभरात लॉकडाऊन जाहीर झालं. तेव्हा आम्ही नुकतंच सरदार उधम सिंगच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात केली होती. हा चित्रपट कठीण आहे, त्यामुळे सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनला भरपूर वेळ जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

sardar udham singh post-production
सरदार उधम सिंगच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात

By

Published : Jun 7, 2020, 5:26 PM IST

मुंबई- अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता अनेक गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. सरकारने काही नियमांसह सिनेमा आणि मालिकांच्या चित्रीकरणालाही परवानगी दिली आहे. अशात आता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'सरदार उधम सिंग' सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. दिग्दर्शक सुजित सरकार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

सुजित सरकार यांनी लिहिलं, "जेव्हा निसर्गाने इशारा दिला तेव्हा आम्ही ऐकलं ... वेगवान गतीने निघालेल्या सर्वांनीच आपली गती थांबवली... आता पुन्हा एकदा कॉल आला आहे. कामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे, एक उत्साह आहे, परंतु खबरदारी घेणंही गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करत आहोत. 8 जूनपासून सरदार उधम सिंगच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकार यांनी सांगितलं, की 24 मार्चला देशभरात लॉकडाऊन जाहीर झालं. तेव्हा आम्ही नुकतंच सरदार उधम सिंगच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरुवात केली होती. हा चित्रपट कठीण आहे, त्यामुळे सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनला भरपूर वेळ जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, सुजित यांचा गुलाबो सिताबो सिनेमा येत्या 12 जूनला अमॅझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details