मुंबई - मालदीव येथून सुट्ट्यांच्या आनंद घेऊन अभिनेत्री सारा अली खान अलिकडेच मुंबईत परतली आहे. दरम्यान तिने आई अमृता सिंगसोबत जुहूच्या शनी मंदिरात जाऊन शनी देवाचे दर्शन घेतले.
यावेळी सारासोबत तिचे नातेवाईकही होते. अगदी साध्या मेकअपमध्ये असलेल्या साराने चाहत्यांचे लक्ष यावेळी वेधले.
आई अमृता सिंगसोबत साराने घेतले शनिदेवाचे दर्शन हेही वाचा -'जर्सी'च्या सेटवर जखमी झाल्यानंतर मीरासोबत मुंबईला परतला शाहिद
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा अली खान लवकरच वरूण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटात दिसणार आहे. तर, कार्तिक आर्यनसोबतही 'आजकल' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा -पंतग महोत्सवात सहभागी झाले वरुण - श्रद्धा, 'स्टीट डान्सर'चं केलं प्रमोशन