मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या कामाच्या व्यापातून विश्रांती घेऊन मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहीमसोबतचे बरेचसे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, यापैकी तिने शेअर केलेले बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहेत. साराच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
सारा अली खानने अल्पावधीतच चाहत्यांमध्ये लोकप्रियता पाहायला मिळते. अवघ्या दोनच चित्रपटातून तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. लवकरच ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' आणि कार्तिक आर्यनसोबत 'आजकल' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.