महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सारा अलीच्या आईने का लपवला चेहरा? व्हिडिओ झालाय व्हायरल - Sara Ali Khan video

सैफ अली खानची मुलगी सारा अलीने शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात साराची आई अमृता सिंग स्वतःचा चेहरा लपवत हसताना दिसत आहे.

अमृता सिंग चेहरा लपवत हसताना

By

Published : Oct 7, 2019, 7:40 PM IST

सैफ अली खानची मुलगी सारा अली आईसह रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल झालाय. साराने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात साराची आई अमृता सिंग स्वतःचा चेहरा लपवत हसताना दिसत आहे.

अमृता सिंग यांच्या टेबलवर एक लांबलचक डोसा दिसत आहे. डोशाचा आकार पाहून अमृता हासायला लागल्या. साराने लगेचच आपल्या मोबाईलवर याचे शूटींग सुरू केले. ते पाहून अमृताने स्वतःचा चेहरा लपवलाय यावेळी सारा आईला विचारत आहे, ''की हासायला काय झालं?, चेहरा का लपवतेस?''

साराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "जेव्हा मी आणि मम्मी खाण्यासाठी बाहेर गेले तोव्हा डायटची आम्हाला पर्वा नव्हती. अशा प्रकारचे खाणे काही सोपी गोष्ट नाही. फूड कॉपींटिटर्सनाही घाम फुटेल." अशा प्रकारे सारानेच आईची खिल्ली उडवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details