मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अल्पावधीतच चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. 'केदारनाथ' आणि 'सिंबा' या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. विविध पुरस्कार सोहळ्यातही ती हजेरी लावत असते. अलिकडेच तिने 'किड्स चॉईस अवार्ड्स' सोहळ्यात माधुरीच्या 'एक, दोन, तीन' गाण्यावर डान्स सादर केला. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साराच्या डान्सचा व्हिडिओ आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तिला या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारही मिळाला आहे. या पुरस्कारासोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा -भाईजानची पडद्यावर पुन्हा जादू, 'दबंग ३'ची पहिल्या दिवशीची दमदार ओपनिंग