मुंबई -'केदारनाथ', 'सिंबा' या दोनच चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी सारा अली खान अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिच्या बालपणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे.
सारा अली खानचा क्युट अंदाज; तिच्या बालपणीचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल - social media
साराचा हा व्हिडिओ सैफ अली खानसोबत एका चित्रपटाच्या सेटवरचा आहे. यामध्ये सैफ अली खानदेखील पाहायला मिळतो. साराच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
साराचा हा व्हिडिओ सैफ अली खानसोबत एका चित्रपटाच्या सेटवरचा आहे. यामध्ये सैफ अली खानदेखील पाहायला मिळतो. साराच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच व्हायरल झाला आहे.
सध्या सारा तिच्या आगामी 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारत आहे. साराचे आत्तापर्यंत दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलमध्ये ती कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.