मुंबई - अभिनेत्री सारा अली खान हिचा काल (१२ ऑगस्ट) रोजी वाढदिवस होता. सध्या ती तिच्या आगामी 'कुली नंबर वन' चित्रपटासाठी बँकॉक येथे रवाना झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त 'कुली नंबर वन'च्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. अभिनेता वरुण धवन आणि साराची आई अमृता सिंग यांच्यासोबत साराने तिचा वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साराच्या वाढदिवशीच 'कुली नंबर वन'चं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सारा आणि वरुणचा लूकही पाहायला मिळतो. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी डेव्हिड धवन, जॅकी भगनानी आणि अमृता सिंग हे सर्व एकत्र जमले होते.