मुंबई -अभिनेत्री सारा अली खान आज तिचा २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अवघ्या दोनच चित्रपटातून आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सारा अली खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. लवकरत ती अभिनेता वरुण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. साराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यामध्ये सारा आणि वरुणचा फर्स्ट लूक पाहायला मिळतो.
साराच्या वाढदिवशी 'कुली नंबर १' चं पोस्टर प्रदर्शित, पाहा वरुण - साराचा फर्स्ट लूक!
सारा अली खान लवकरच वरुण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
साराच्या वाढदिवशी 'कुली नंबर १' चं पोस्टर प्रदर्शित, पाहा वरुण - साराचा फर्स्ट लूक!
वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, वसू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
'कुली नंबर १'च्या टीजर पोस्टरमध्ये साराचा ग्लॅमरस लूक दिसतो. तर, कुलीच्या रुपात वरुण धवनही धमाल अंदाजात पाहायला मिळतो. हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट 'कुली नंबर वन' चित्रपटाचाच रिमेक आहे. पुढच्या वर्षी १ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.